निरोगी जीवनासाठी आरोग्यदायी टिप्स

उत्तम आरोग्य आणि निरोगी (Healthy) जीवनशैली आपल्या शरीरातील उर्जा वाढविण्यात आणि प्रत्येक क्रिया चांगली करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास आपल्याला संतुलित आहार व पुरेशी झोप घेण्याची सवय लागते. यामुळे अनेक गंभीर रोग आपल्यापासून चार हात लांब राहतात. संतुलित व निरोगी आहार घेतल्याने शरीराला सर्व आवश्यक ती पोषक तत्त्वे मिळतात जी आपल्या शरीराची कार्ये अचूकपणे चालण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही या सोप्या आरोग्यदायी टिप्सचे पालन केले तर तुम्हाला निरोगी शरीर व शांत मन मिळणे अधिक सोपे होईल.

तुम्ही संतुलित आहार घेत असालआणि दररोज पुरेसा व्यायाम करत असाल तर यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल आणि तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल. जर आपण निरोगी जीवनशैलीचा अवलंबली तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो. तुमचे शरीर अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनते. सर्व गोष्टींचा एकत्रितपणे परिणाम म्हणजे माणूस आनंदी व दीर्घायुषी होतो. या लेखात तुम्हाला निरोगी जीवनशैली कशी मिळवावी यासाठी सोप्या टिप्स दिलेल्या आहेत.

निरोगी (Healthy) जीवनशैली पाळली तर आपली त्वचा निरोगी आणि अधिक काळ तरुण राहते. आपले केस चमकदार व दाट राहण्यास मदत होते आणि एकूणच शरीराचे आरोग्य सुधारते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली निरोगी जीवनशैली अनेक गंभीर आजार, अनेक धोकादायक विषाणू आणि जीवाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती प्रदान करते. परंतु तुमची जीवनशैली ही निष्क्रिय असेल तर तुम्हाला कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, हॉर्मोनल असंतुलन हे आणि इतर अनेक हानिकारक आजार होऊ शकतात.म्हणूनचकायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.

    1) दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.

    2) जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या.

    3) रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या.

    4) रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही.

    5) व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या.

    6) दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या.

    7) नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे.

    8) तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा.

    9) पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

    10) मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा.