मध्ये आता किरकोळ कारणांवरून हाणामारी, लोखंडी रॉड, तलवारी, बंदूका उपसणं धाकदपट काही नवे राहिले नाही. 28 एप्रिल रोजी गेवराई तालुक्यातील उमापूर गावात डॉक्टरसह मेडिकल चालकावर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. डॉक्टरांना बाहेर बोलवा म्हणताच मेडिकल चालकानं पाच मिनिटं बसा म्हणल्याचा राग मनात ठेवून त्याने 10-12 जणांना लोखंडी रॉड,काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर चकलांबा पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर (Doctor) अमोल पवार आणि मेडिकल चालक प्रवीण पवार हे रोजच्या प्रमाणे आपला दवाखाना बंद करून घरी परत जात होते. यावेळी गावातील एका कापसे नावाच्या व्यक्तीने पेशंट तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवले. मात्र मेडिकल चालकाने काही वेळ थांबण्याची विनंती केली. या गोष्टीचा राग मनात धरून कापसे आणि त्याच्यासोबत असलेल्या 10 ते 12 जणांनी अचानक दोघांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांचा वापर करून डॉक्टर आणि चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
