सुपरस्टार रजनीकांत यांचा प्रवास

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत (Rajinikanth) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता आहेत.मनोरंजन व्यवसायातील तमिळ चित्रपट अभिनेता आहेत.

त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही. इ.स.२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी द बॉस’ या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले.[ संदर्भ हवा ] या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

पूर्वायुष्य आणि कुटुंबीय

रजनीकांत (Rajinikanth) ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीय मराठा हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे. गायकवाड कुटुंबियांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात धाकटे आहेत. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील, पुरंंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे सांगितले जाते. रजनीकांत ह्यांना सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्वर राव गायकवाड हे दोन मोठे भाऊ आणि एक अश्विनी बाळुबाई गायकवाड नावाची एक बहिण ही आहे. रजनीकांत ह्यांच्या सहचारिणी लता रंगाचारी ह्या असून त्यांना ऐश्वर्या शिवाजीराव गायकवाड ऊर्फ ऐश्वर्या रजनीकांत आणि सखुबाई शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सौंदर्या रजनीकांत ह्या दोन मुली आहेत.

पार्श्वभूमी

शाळेत असतांना दारिद्र्यामुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली. त्यानंतर ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून नियुक्त झाले. कंडक्टर असताना त्यांची तोंडाने शिट्टी वाजविण्याची कला लोकप्रिय झाली होती. नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नईला चित्रपटातील अभिनय शिकण्याकरीता गेले. मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली.

गौरव, पुरस्कार आणि सन्मान

1) २००० मध्ये भारत शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.

2) जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअरने सन्मानित.

3) जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतिक चित्रपटातील योगदानाबद्दल.

4) टाईम्स मॅगझीनने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.

5) आशिया खंडातील चित्रपट उद्योगात जॅकी चॅननंतरचे सर्वात अधिक मानधन मिळविणारे कलाकार.

6) आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वाधिक प्रसिद्धीबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्‌समध्ये नोंद.

7) ६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.

9) ९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.

10) १० वेळा फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार.

11) महाराष्ट्र शासनाचा २००७चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेता.

12) १९९५मध्ये आध्यात्मिकतेकरिता “ओशोबिस्मित” पुरस्काराने सन्मानiत.

13) भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा शेव्हलियर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.

14) २०१६ पद्मविभूषण पुरस्कार

15) दादासाहेब फाळके पुरस्कार

लोककल्याण

रजनीकांत यांनी वेळोवेळी तमीळ लोकांकरिता आणि लोकाधिकारांकरिता उपोषणे केली आहेत. शासनावर दबाव टाकण्याकरिता त्यांनी नेहमीच समाजघटकांना मदत केली आहे. रजनीकांत त्यांच्या दानशूरतेसाठीही ओळखले जातात.