कोणत्याही आजारावर उपचारासाठी तुम्ही रुग्णालयात पोहचता, त्यावेळी उपचारासाठी मोठा खर्च येतो. भल्याभल्यांची बचत साफ होते. सर्वसाधारण आजारावर उपचारासाठी मोठा खर्च येतो.
गरीबांना तर खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्यातच नसतो. शासकीय रुग्णालयात त्यांना उपलब्ध उपचार करावा लागतो. त्यासाठीच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली आहे. त्यामध्ये देशातील कोट्यवधी गोरगरिबांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येतात. या योजनेत मोठंमोठ्या शस्त्रक्रिया करता येतात.
आयुष्मान भारत योजनेमध्ये 1760 प्रकारच्या आजारांवर इलाज करण्यात येतो. आता यामध्ये 196 आजार आणि शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयात या आजारावर या योजनेतंर्गत उपचार होत नाही. यामध्ये मोतीबिंदू, सर्जिकल डिलिव्हरी, मलेरिया यासह इतर अनेक आजारांचा समावेश आहे.
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोण-कोणत्या सर्जरी तुम्ही करु शकता, हे तुम्हाला माहिती आहे का? आयुष्यमान भारत योजनेतंर्गत प्रोस्टेट कँसर, डबल वॉल्व रिप्लेसमेंट, कोरोनरी आर्टरी बायपास, पल्मनरी वॉल्व रिप्लेसमेंट, स्कल बेस सर्जरी, टिश्यू एक्सपेंडर, पीडियाट्रिक सर्जरी, रेडिएशन ओंकोलॉजी, न्यूरोसर्जरी, अँजियोप्लास्टी विद स्टेंट या सारख्या शस्त्रक्रिया करता येतात. या योजनेतंर्गत ही सर्जरी तुम्ही खासगी रुग्णालयात पण करु शकता.