मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे आता मुंबईत नेमकं कसं यायचं? मार्ग काय? याचा प्लॅन काय हेच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. तब्बल ३ कोटी मराठे मुंबईत येतील असा दावा करत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कात उपोषण करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे जाण्याचा मार्ग निश्चित होणार आहे. मिळेल त्या वाहनाने या, आंदोलन काळात पुरतील तेवढ्या वस्तू सोबत ठेवा, असं आवाहन करत सोबत काय काय घ्यायचं हे सांगितले जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगे पाटील यांनी तीनदा आतापर्यंत उपोषण केलं. पहिल्यांदा पोलिसांचा लाठीचार्ज झाला. त्यानंतर सरकारने दोनदा शिष्टमंडळ पाठवून मुदत घेतली. आता २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपलाय. त्यामुळं मुंबईत शेवटचं आंदोलन असेल असंही जरांगे पाटील म्हणाले.
Related Posts
३१ जानेवारी २०२४ पर्यंतचे आंदोलनाचे खटले मागे
राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे…
आमदार अपात्रतेची सुनावणी होणार बुधवारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी येत्या बुधवारी, 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मिंधे गटाच्या आमदारांना…
Cyclone Remal Update: रेमल चक्रीवादळाचा कहर
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ रेमल आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. या चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला…