ठाण्यात पहिली मेट्रो धावली आहे. मीरा-भाईंदर येथील मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची आज यशस्वीरित्या चाचणी पार पाडली आहे. पहिला टप्पा हा 4.4 किमी लांबीचा असून दहिसर पूर्व ते काशिगाव असा असणार आहे. तर या मेट्रो मार्गावर एकूण 8 स्थानके असणार आहेत. मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास 96 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी झाली.
मेट्रो 9 मार्गिकेमुळं पहिल्या टप्प्यात एकूण चार स्थानके आहेत. दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव अशी या स्थानकांची नावे आहेत. तसंच, या मार्गिकेमुळं मीरा-भाईंदर, दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याकरता मेट्रो ९ प्रकल्प महत्वाचा आहे. सध्या या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी सुरू आहे. तसंच, या प्रकल्पाची सकारात्मक बाब म्हणजे प्रथमच डबलेकर ब्रीज तयार करण्यात आला आहे. म्हणजेच फ्लायओव्हर आणि मेट्रो दोन्हीही एकाच पिलरवर पाहायला मिळतेय. तसंच, मेट्रोचा विस्तार विरारपर्यंत होणार आहे.
महामुंबई मेट्रो 9चा चाचणी टप्पा आज पार पडतो आहे. या मेट्रो 9 मुळे मिरा भाईंदर तसंच मुंबईहून येणाऱ्या जाणा-यांना खुप फायदा होणार असून काशीगाव ते दहिसर असा हा टप्पा आहे. आपल्याला सिमलेस कनेक्टिविटी करायची आहे. MMR रिजन मध्ये पहिल्यांदा डबलडेकर ब्रिज देखील तयार करण्यात आलाय. मेट्रो आणि गाड्यांचा ब्रिज एकाच स्ट्रक्चरमध्ये पहायला मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
मोठी वाहतूक कोंडी यामुळे कमी होईल. याचेच एक्सटेंशन विरार र्यंत होणार आहे. सर्व मेट्रो आपापसात जोडल्या जात आहेत. आता अधिक वेगाने काम करू. 2027 च्या शेवटापर्यंत ही सर्व कामे होतील, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
