इचलकरंजीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली…..

सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी इचलकरंजीत सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. भाजपने राज्यात केलेल्या पाडापाडीचा सूड आपण घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतेय. शिंदे गटाचे धैर्यशील माने, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील टक्कर देत आहेत.

सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना भाजपची युती असताना शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपने कशी सेटींग केली होती हे सांगत आपण सूड घ्यायला आलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. ‘पाडापाडीचे धंदे केले. मी सूड घ्यायला आलो आहे. तुम्हीदेखील सूड घेतला पाहिजे,असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.