विट्यातून मायणी मार्गे पंढरपूरकडे कंटेनर निघाला होता तर मायणीकडून सांगलीच्या दिशेने कांदा वाहतूक करणारा ट्रक निघाला असताना घाणवड जवळ या दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातानंतर ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरून खाली जाऊन पलटी झाला. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनातील चार ते पाच लोकांना नागरिकांनी बाहेर काढून त्यांना तातडीची मदत दिली.
या अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. या अपघात प्रसंगी विट्यातून नवनाथ हातेकर यांनी नागरिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना मदत करून माणुसकीचे दर्शन दिले. या अपघातातील सर्वजण सुखरूप असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.