महसूल विभागांतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान पंढरपूर महसूल विभागांतर्गत ११ मंडळ स्तरावर राबिवण्यात येत आहे. या शिबीरातून आवश्यक दाखले देण्यात येणार असून, याचा लाभ विद्यार्थी,नागरिकांनी घ्यावा,आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक दाखले उदा.उत्पन्न, वय व अधिवास, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेयर दाखला व इतर दाखले देण्यासाठी तसेच नागरिकांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले देण्यासाठी पंढरपूर तालुक्यात पंढरपूर, भाळवणी, पुळूज, कासेगांव, तुंगत, भंडीशेगांव, खर्डी, चळे, रोपळे, करकंब, पटवर्धन कुरोली या महसूल मंडळाचे ठिकाणी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या मंडळातील गावातील नागरिक, विद्यार्थी यांनी आपापल्या मंडळाच्या केंद्राच्या ठिकाणी जावून शिबिराचा लाभ घेण्याचा आहे. तरी शालेय विद्यार्थी व नागरिकांनी गाव निहाय महा ई सेवा केंद्र चालक यांच्याशी संपर्क साधवा. या शिबीरामध्ये जास्तीत संख्येने उपस्थित राहन दाखले प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन तहसिलदार लंगुटे यांनी केले आहे.