पंढरपुर येथे मावा आणि गुटख्याची खुल्लम खुल्ला विक्री; विविध ठिकाणी छापे

पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी मावा आणि गुटख्याची खुल्लम खुल्ला विक्री होत असल्याची तक्रार अन्न व भेसळ अधिकारी यांच्याकडे आली होती. शहर पोलिसांना सोबत घेऊन शहरातील विविध ठिकाणी छापे मारून तपासणी केली असता पाच ठिकाणी विमल पान मसाला, आरडीएम पान मसाला, व्ही वन सुगंधित तंबाखू, एम सुगंधी तंबाखू, ओला मावा, विना लेबल सुगंधित तंबाखू, राजू सुगंधि सुपारी, रजनीगंधा पान मसाला अशा प्रकारचा माल मिळून आल्याने शहरातील छोटे व्यापारी व पान विक्रेत्यात खळबळ उडाली. 

शहरातील शिवाजी चौक, कालिकादेवी चौक, काळा मारुती चौक, कॉलेज चौक, ठाकरे चौक इत्यादी ठिकाणी पान शॉप ची तपासणी केली असता पान शॉप मध्ये मावा, सुगंधी तंबाखू व पान मसाला इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा विक्रीच्या हेतूने साठविलेला आढळून आला. या पानपट्टी मालकावर कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी राजेश बजरंग थिटे, अबरार रमजान तांबोळी, सोहिल रफिक बागवान, रईस इकबाल बागवान, अनिल विठ्ठल कळकुंबे यांना ताब्यात घेण्यात आले. अन्न भेसळ सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर, श्रीमती अस्मिता टोणपे, श्रीमती रेणुका पाटील, श्रीमती नंदिनी हिरेमठ यांनी कारवाई केली.