आष्ट्यात रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ 

विशेष रस्ते अनुदान योजनेतून आष्टा येथील जिजामाता बालक मंदिर ते खोत मळा रस्ता डांबरीकरण कामासाठी ३१ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ प्रवीण माने यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

 
यावेळी सोमाजी शेळके, पांडुरंग खोत, वसंत खोत, शंकर खुडे, संजय यादव, धनाजी पवार, भूपाल खोत, अतुल खोत, दीपक खोत, जयवंत खोत, संजय पवार, गोरख गडदे, विकास खंबाळे, डॉ. सतीश बापट, तानाजी खोत, रोहित यादव-पाटील, संजय हिरुगडे, सागर खुडे, संदीप खोत, वसंत खोत यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले, गांधीनगरपासून खोत मळ्याकडे येणारा रस्ता हा शहरातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा रस्ता म्हणून समजला जातो. अनेक वर्षापासून हा रस्ता रखडला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची तसेच नव्याने रस्ता बनवण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून सातत्याने होत होती. विशेष रस्ता अनुदान योजनेतून आणि निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्यातून या रस्ता कामाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. हा रस्ता दर्जेदार बनवला जाईल. स्थानिक नागरिकांनी ही रस्ता कामाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले. यावेळी संदीप गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. जयवंत खोत यांनी आभार मानले.