पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या वारजे परिसरात विजेचा धक्का बसून एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वारजेतील रामनगर भागात संध्याकाळी सुमारे पावणेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. मयंक प्रदीप आडगळे (वय 10 वर्ष) असे या मृत बालकाचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आडगळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मयंक आडगळे हा आपल्या घरासमोर खेळत होता. यावेळी त्याचा अनावधानाने विजेच्या खांबाला स्पर्श झाला. मात्र या विजेच्या खांबाला विद्युत प्रवाहाचा संपर्क आल्याने परिणामी या विजेच्या खांबातही विद्युत प्रवाहाच संपर्क झाला. अशातच, मयंकला त्याच वेळी तीव्र शॉक बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मयंक घराबाहेर मित्रांसोबत खेळत होता. खेळताना तो चुकून घरासमोर असलेल्या लोखंडी विजेच्या खांबाला टेकला आणि त्याच वेळी त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. काही क्षणातच तो खाली कोसळला. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तत्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताना मृत घोषित केलंय.
