आ. बाबासाहेब देशमुख यांची पंचायत राज समितीवर निवड

महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या सदस्यपदी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड झाली आहे . राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कामकाजावर विविधमंडळाचे नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची अशी ही पंचायत राज समिती असून या समितीमध्ये २५ सदस्य संख्या असून २८८ विधानसभा आमदारातून २० सदस्य व विधानपरिषद आमदारातून ५ सदस्यांची विवाद केली जाते.

जिल्हा परिषदांना वेगवेगळ्या योजना या कार्यक्रम राबवण्यासाठी विकास निधी दिला जातो. त्या विकास निधीचे योगय त्या प्रकारे विनियोग होतो कि नाही यावरती लक्ष्य ठेवण्यासाठी पंचायत राज समितीचे महत्वपूर्ण काम आहे. अशी ही महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण पंचायत राज समिती असून, त्यावरती आ. डॉ. देशमुख यांची निवड झाली आहे.