आरक्षण मिळवल्याशिवाय आता सरकारला सुट्टी नाही; आम्ही संयम बाळगला आहे त्याचा अंत पाहू नका, असा इशारा मराठा समाजाने दिला. गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाचा सांगोला येथे महामोर्चा संपन्न झाला. सदर मोर्चाची सुरुवात महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. यावेळी समाज बांधव, महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मोर्चाचे रूपांतर छत्तपत्री शिवाजी महाराज चौकात सभेत रूपांतर झाले. व्यासपिठावर शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सुष्टी शिंदे यावेळी म्हणाली, समाजाला आज रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. मराठा समाजावरील अन्याय थांबला पाहिजे त्यासाठी हे आंदोलन. खरोखर आरक्षण मिळेल तेव्हा लढा थांबेल.. आरक्षणाच्या नावावर गुणवत्तेची धिंड काढली जाते. श्रुती मोरे बोलताना म्हणाली की, उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मराठा आरक्षण आमचा हक्क आहे. आमच्या हक्कासाठी आम्ही आरक्षण मागतोय. तो आम्ही मिळवणारच आहे. सरकारला झोपेची सोंग घेत आहे. आश्वासन नको आरक्षण द्या. जरांगे पाटील सारखा वाघ आमच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे आरक्षण मिळणारच असल्याचा विश्वास व्यक्त केला.