सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. जनतेच्या मागण्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. सांगोला तालुक्यातहि अनेक विकासकामे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. जनतेच्या अपूर्ण मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे. सांगोला तालुक्यातील
मौजे जवळे येथील श्री. अकरारुद्र मारुती मंदिर, श्री.नाथ मंदिर आणि श्री. ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्टील जाळीचे कंपाउंड व गेट नग दोन चे मा. आ. दीपकआबा साळुंखे- पाटील व ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्री. चंद्रकांत देशमुख गुरुजी यांनी करून घेतले. व ते श्री. चरणी अर्पण केले. सदर गेट व जाळीसाठी ५० हजार रुपये खर्च आला आहे. बसवलेल्या कंपाउंडमुळे त्या ठिकाणी होणारी अस्वच्छता कमी झालेली आहे त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ दिसत आहे. देवाच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक समाधान व्यक्त करत आहे. यापुढे असेच नवनवीन उपक्रम देवस्थानच्या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत.