शेअर्स ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे गुंतवणुकीवर ९१ ते २५१ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून डॉ . दशावतार गोपालकृष्ण बडे ( ५६, रा जवाहरनगर ) यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ९३. ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला अटक केली. निष्कर्ष सिद्धार्थ गेडाम ( वय ३१ रा. बौद्धविहार जवळ, नागपूर) असे त्याचे नाव आहे . त्याला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यापूर्वी या प्रकरणात बंधन बँकेचा सेल्स मॅनेजर अनिष रशिद शाह ( वय ३२, रा. हिंगणा रोड , नागपूर ) रितेश अरुण वंजारी (वय ३६, रा. नागपूर ) व मोहन महादेव साहू (वय ३८ , रा. देवळी रोड , धुळे ) या तिघा संशयितांना अटक झाली आहे . या प्रकरणातील आणखी चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याची माहिती पो. नि. सचिन पाटील यांनी दिली .
मोहन साहू याने आपल्या बँक खात्यावरून ४ लाख रुपये काढून ते रितेश वंजारी या अनिष शाह या दोघांना दिले होते , तर त्या दोघांनी निष्कर्ष गेडाम याच्याकडे ही रक्कम दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले . त्यामुळे गेडाम यास अटक केली .