आग्रा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत इस्लामपूर येथील माझी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी आपल्या ताकद व कौशल्याची चुणूक दाखवित पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत जयंत स्पोर्ट्सच्या ६ खेळाडूंनी ७ सुर्वण , रौप्य आणि कांस्य पदके पटकावली आहेत. जयंत स्पोर्ट्सचे प्रशिक्षक हर्षद बारे यांनी सुवर्ण , ओमकार पाटील यांनी रौप्य , मनीष यादव यांनी सुवर्ण , भूषण भोसले यांनी सुवर्ण , वरद महिंद यांनी सुवर्ण , ऋषिराज देशमुख यांनी सुवर्ण व रौप्य पदक पटकावले आहे. समर्थ घबक आणि शिवराज पाटील यांनीही शर्थींची लढत दिली .
प्रत्येक खेळाडूने वजन गटात शानदार प्रदर्शन केले आणि राज्याचा ,जिल्ह्याचा राष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक केला. या खेळाडूंना प्रशिक्षक हर्षद बारे यांचे प्रशिक्षण आणि सांगली जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष , माजी नगरसेवक खंडेराव जाधव यांचे प्रोत्साहन मिळाले. माजी आ. जयंतराव पाटील , राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष , युवा नेते प्रतीकदादा पाटील , सांगली जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खंडेराव जाधव यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .