या सुपरस्टारच्या लेकीचा अभिनय सोडण्याचा निर्णय;

दरवर्षी बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स लाँच होत असतात. पण त्यापैकी काही जणच आपले स्थान निर्माण करू शकतात. तर काहीजण एक-दोन चित्रपटांनंतर बरेच सेलिब्रिटी गायब होतात. 2015 मध्ये, एका सुपरस्टारच्या मुलीला एका मोठ्या बॅनरखाली लाँच करण्यात आलं, परंतु तिच्या वडिलांचे स्टारडम तिच्या कामी मात्र आले नाही. या अभिनेत्रीने फक्त चार चित्रपट केले. मात्र ते चारही चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामुले ती गेल्या 6 वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब झाली.आता ती कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीये. आता या अभिनेत्रीने अभिनयातून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे.

ही अभिनेत्री म्हणजे सुनील शेट्टीची (superstar’s)मुलगी अथिया शेट्टी आहे. अथियाने असे का केले याचा सुनील शेट्टीने स्वत: खुलासा केला आहे. ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी यांनी खुलासा केला आहे की त्यांची मुलगी अथिया शेट्टीने चित्रपट जगताला निरोप दिला आहे. अथियाने 2015 मध्ये सलमान खानच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ज्यामध्ये तिच्यासोबत सूरज पंचोली देखील दिसला होता. यानंतर, तिने ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ सारखे आणखी दोन चित्रपट केले, परंतु तिन्ही चित्रपट फारसे चालले नाहीत आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी केली नाही. एका मुलाखतीत सुनील शेट्टीने खुलासा केला की, अथियाने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे कारण तिला आता तिच्या आयुष्यातील एक नवीन आणि खास टप्पा म्हणजे आईत्व पूर्णपणे स्वीकारायचं आहे.

बॉलिवूड सोडण्याचा निर्णय का घेतला?

सुनील शेट्टीने(superstar’s) सांगितलं की, ‘मोतीचूर चकनाचूर नंतर, अथियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तिला त्यात रस नव्हता. तिने मला स्पष्ट सांगितले की बाबा मला हे करायचे नाही आणि ती निघून गेली. मी तिच्या प्रामाणिकपणाची आणि स्पष्टतेची प्रशंसा करतो. आज ती तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भूमिका साकारत आहे, ती म्हणजे एका आईची. आणि ती हा नवीन अध्याय मनापासून जगत आहे. 24 मार्च 2025 रोजी, अथिया शेट्टी आणि तिचा पती भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. अथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, तिचे नाव तिने इवारा ठेवले. या नावाचा अर्थ ‘देवाची देणगी’ असा होतो.

या चित्रपटांमध्ये काम केलं आहे

आम्ही तुम्हाला सांगतो की, अथियाने तिच्या छोट्याशा कारकिर्दीत फक्त चार चित्रपट केले. सलमान खानने ‘हिरो’ चित्रपटातून अथियाला लाँच केले होते. या चित्रपटात ती सूरज पंचोलीच्या विरुद्ध दिसली होती. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला. दोन वर्षांनंतर ती अर्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ चित्रपटात दिसली. त्यानंतर तिने 2018 मध्ये ‘नवाबजादे’ मध्ये काम केलं आणि त्यानंतर ती शेवटची ‘मोतीचूर चकनाचूर’ मध्ये दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी होता. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या कामाचे खूप कौतुक झाले, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. तेव्हापासून, अथिया कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.