कोकणात पावसाचा कहर, वरुणराजा कोपला, वीज पडून तरुणाचा मृत्यू

कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात मे महिन्यातच जुलै महिन्यातील आषाढ सारखा तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता मान्सूनपूर्व पावसाने आर्थिक दणका दिल्यानंतर आता कोकणासमोर ऐन मे महिन्यातच जलसंकट उभ राहिल आहे. त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. तर, काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

पहिल्याच पावसात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली वणंद येथील 48 वर्षे वयाचा इसम नदी ओलांडताना सायकलसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बेपत्ता इसमाचा दापोली प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे. कर्जत रायगड नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बिरदोले गावातील तरुणाचा अंगावर विज पडून मृत्यू झाला आहे. रोशन कचरू कालेकर (वय 25 वर्ष) हा शेतावर काम करीत असताना विज पडून मृत्यू झाला आहे.

दापोली येथे इसम वाहून गेल्याची ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला पूर आल्याने पुलावरुन पाणी वाहत होतं. याच कोंडीच्या पुलावरुन ड्युटीवरुन घरी परतत असताना राजेंद्र कोळंबे हे त्यांच्या सायकलसह वाहून गेले. दापोली पोलीस प्रशासन, महसूल विभाग, गावकरी नदीपात्रात त्यांचा शोध घेत आहेत.