आष्ट्यात राजारामबापू पाटील पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्या उद्घाटन

आष्टा येथील राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी ता. ६ जून २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादीचे खास. अमोल कोल्हे यांच्या हस्ते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तरी नागरिक, सभासदांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव व राष्ट्रवादी श.प.गटाचे वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 यावेळी संग्राम जाधव म्हणाले, संस्थेच्या आष्टा येथील प्रधान कार्यालयासह भडकंबे व इस्लामपूर येथे शाखा आहेत. इस्लामपूर व भडकंबे येथे पाच कोटींच्या ठेवी आहेत. संस्थेचे वसूल भाग भांडवल १ कोटी ८० लाख, निधी ८ कोटी २६ लाख, ठेवी ६६ कोटी ४५ लाख, कर्जे, ५१ कोटी ५८ लाख आहेत. संस्थेला ढोबळ नफा २ कोटी ५० लाख झाला असून खेळते भांडवल ८१ कोटी २७ लाख आहे.

 रघुनाथ जाधव म्हणाले, संस्थेने १९८९ पासून अविरत सेवा दिली आहे. संपूर्ण कामकाज संगणकीकृत. सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा युक्त आहे. आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त मिळाले आहेत. सभासदांना १२ टक्के लाभांश दिला जातोय. सर्व वीज बिले स्वीकारली जातात. शुक्रवारी ता. ६ जून रोजी नवीन इमारतीचे उद्घाटन खा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते, आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, शामराव पाटील, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, विजय पाटील, बाळासो पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 यावेळी व्हा. चेअरमन यशवंत कुलकर्णी, सचिव विजय शिंदे, एन. डी. कुलकर्णी, जयवंतराव फडतरे, संग्राम जाधव, अनिल रुकडे, मुकुंद इंगळे, संदीप तांबेकर, अर्जुन यादव-पाटील, सागर शहा, अरुण जाधव, आनंदराव ढोले, सौ. सिंधू मस्के, सौ. कल्पना पाटील, प्रमोद आटुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.