२५ व २६ जानेवारीला राजारामनगर येथे मानधन कुस्ती स्पर्धेचे आयोजन

अनेक भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला भेटतो. अनेक भागात यात्रेनिमित्त विविध स्पर्धां देखील घेतल्या जातात. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या स्मृतीदिनानिमित्त मानधन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ व २६ जानेवारी २०२५ रोजी राजारामबापू कुस्ती केंद्र, राजारामनगर येथे होणार आहे.

या स्पर्धेत राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना कार्यक्षेत्रातील पुरुष आणि महिला दोघांसाठीही सर्व वयोगट व वजनी गटांसाठी सहभाग खुला आहे. कुस्ती खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार असून, त्यांच्या कारकिर्दीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाच्या वतीने सर्व कुस्तीपटूंना या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.