आष्टा शहरात नगरपालिकेच्यावतीने झालेल्या विकास कामांचे डिजिटल फलक लावून काहीजण राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सर्व फलक अनाधिकृत आहेत नगरपालिका प्रशासनाने हे फलक तात्काळ काढून घ्यावेत, अन्यथा प्रशासक विरोधात तीव्र आंदोलन करु, प्रसंगी आष्टा नगर पालिकेवरती राष्ट्रवादी कार्यालय असा फलक लावू असा इशारा आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांनी प्रशासक तथा प्रांतधिकारी, मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.
यावेळी दिलीपराव वग्यानी, विराज शिंदे, रामचंद्र सिद्ध, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव संदीप माने, सयाजी गावडे, शशिकांत भानुसे, अशोक भानुसे, शिवसेनेचे राजू माने प्रकाश सिद्ध, दीपक तानगे, तौफिक कुलकर्णी, टिपू अत्तार, उपस्थि होते. निवेदनात म्हंटले आहे की, आष्टा शहरातील शासनाच्या विकासकामा बाबत तत्कालीन भाजप व सध्याचे अ. प. राष्ट्रवादी पक्ष पदाधिकाऱ्याने आष्टा शहरांमध्ये विकास कामांचे कायमस्वरूपी बोर्ड लावून जनतेची दिशाभूल करून जाहिरात केलेली आहे.
पूर्वी असे फलक हटवण्याबाबतचे निवेदन देऊनही अद्याप संबंधित पदाधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केल्याचे तथा फलक काढल्याचे दिसून येत नाही. आष्टा शहरातील जनतेची दिशाभूल करणारा पदाधिकारी याच्यावर कायदेशीर कारवाई, तात्काळ अनधिकृत असणारे सर्व फलक काढावेत अन्यथा ता. ३ जून रोजी आष्टा नगरपरिषद कार्यालयाला राष्ट्रवादी कार्यालय असा बोर्ड लावण्यात येईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या आष्टा शहर युवक काँग्रेस वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी शिवाजी चोरमुले यानी मनोगत व्यक्त केले.