इचलकरंजी, शहरातील सीईटीपी ते बीग बझार रोड या रस्त्याचे भर पावसातच डांबरीकरण सुरु असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी जाब विचारल्याने डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आले. तर पावसाळ्यात कोणतेही रस्ते डांबरीकरणाचे काम करण्यात येणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अभियंता गुरव यांनी सांगितले असल्याची माहिती बावचकर यांनी दिली.
शहरात सध्या राज्य शासनाकडून मंजूर ५२ कोटीच्या निधीतून विविध रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरु आहे. पण मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर शहरातील डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आले होते. कांही दिवसांपूर्वी जवाहरनगर परिसरात असाच प्रकार घडल्यानंतर नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. हाच प्रकार बुधवारी सकाळी सीईटीपी ते बिग बझार रोड परिसरात घडला. दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होत आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस सुरु झाला. डांबरीकरणाचे काम थांबविण्यात त्यानंतर अधून – मधून पावसाच्या सरी येतच होत्या.
पावसामध्ये डांबरीकरणचे सुरू असलेले काम माजी नगरसेवक शशांक बाचवकर यांनी बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब विचारला. आले होते. कांही दिवसांपूर्वी जवाहरनगर परिसरात असाच प्रकार घडल्यानंतर नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. हाच प्रकार बुधवारी सकाळी सीईटीपी ते बिग बझार रोड परिसरात घडला. दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होत आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस सुरु झाला. डांबरीकरणाचे काम थांबविण्यात त्यानंतर अधून – मधून पावसाच्या सरी येतच होत्या. अशातच पाऊस पडत असताना सीईटीपी ते बीग बझार रोड या मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरु होते. ही बाब माजी नगरसेवक बावचकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांनी अभियंता गुरव यांच्याशी संपर्क साधला. पावसात डांबरीकरणाचे काम दर्जेदार होत नसल्याची तक्रार करत ते तातडीने काम बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर डांबरीकरणाचे काम बंद करण्यात आले.
