सिंघम अगेन चित्रपटात पोलिसाच्या भुमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

 बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगनेमध्ये पोलिसाची भुमिका साकरण्यासाठी या अभिनेत्रीने तीचा पहिला लुक शेअर केला आहे. चाहत्यांनी तीचा लुक पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री दिपीका पदूकोणने तिचा पहिला लुक शेअर केला आहे. यात ती पोलिसांच्या भुमिकेत झळकणार आहे. 

तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दीपिकाने दोन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पोलिसांचा युनिफॉर्म परिधान करताना दिसत आहे. ती बंदुकीसह पोज देताना दिसते. दीपिकाने पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांत, तिचा अभिनेता-पती रणवीर सिंग याने “आग लगा देगी” अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रेश्रकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.