बिस्किट कंपनी पार्ले-जीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी त्यांच्या बिस्किटांच्या पाकिटावर Zervan J Bunshah नावाच्या युट्युबरचा फोटो लावला आहे. तोही त्या पॅकेटच्या जागी ज्यामध्ये वर्षानुवर्षे प्रसिद्ध मुलीचा फोटो होता.
हे सर्व घडले ते जिरवानने केलेल्या एका मजेदार व्हिडिओमुळे, ज्यामध्ये तो विचारतो, “जर तुम्ही पार्लेच्या मालकाला भेटलात तर तुम्ही त्याला काय म्हणाल? पार्ले सर? मिस्टर पार्ले? की पार्ले जी?” व्हिडिओमध्ये जिरवान कारमध्ये बसून विचार करताना दिसत आहे.
पार्ले जी ने आपल्या फेसबुक अकाऊंटवर जिरवानच्या फोटोसह लिहिले की, “जोपर्यंत तुम्हाला पार्ले-जीच्या मालकाला काय म्हणायचे हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडत्या बिस्किटासह एक कप चहाचा आनंद घेऊ शकता.” मजा करा.या व्हिडिओवर इंस्टाग्राम यूजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने पार्ले-जीचे लक्ष वेधून घेतले आणि कंपनीने एक मजेदार पोस्ट केली आहे. पार्ले-जीकडून उत्तर मिळाल्याने जिरवानला आनंद झाला.