संन्यास सोडून उभी केली कोट्यवधींची कंपनी

शोभित कुमार सिंह उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी आहे. त्यांचा जन्म एका धार्मिक कुटुंबात झाला असून त्यांनी 1997 मध्ये अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्समध्ये बीए ऑनर्स केले होते. पुन्हा 1999मध्ये त्यांनी फायनान्समध्ये एमबीए केले. त्यांनी दिल्लीत एका जर्म सॉफ्टवेअर कंपनीत पहिली नोकरी केली. तिथे त्यांनी असिस्टंट मॅनेजर म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच त्यांचे मन अध्यात्माकडे झुकलेले होते. त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. त्यात वैदिक व्यवस्थापन कार्यक्रम, इस्लामिक शिकवणी आणि ख्रिश्चन धर्मशास्त्र यांचा समावेश आहे.

एमबीए आणि नंतर जर्मन सॉफ्टवेअर फर्ममध्ये करिअर सुरू केल्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी शोभित यांनी भौतिक सुखाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. ते ऋषिकेश येथे महर्षि महेश योगी यांच्या आश्रमात सन्यांसी म्हणून राहू लागले. तिथे त्यांनी जवळपास 18 महिने वास्तव्य केले. साधारण दीड वर्षांनंतर आई-वडिलांच्या दबावानंतर त्यांनी सन्यांसी आयुष्य सोडून लग्न केले. त्यांची पत्नी बडोद्यातील गुजरातच्या एका व्यावसायिक कुटुंबातील होती. त्यामुळंच त्यांनी बिझनेसमध्ये पाऊल ठेवले.

शोभित कुमार सिंह यांनी स्टोन सफायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला एक अग्रगण्य मेक इन इंडिया स्टेशनरी आणि खेळण्यांचा ब्रँड बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या कंपनीने (Company) 120 कोटींचा टर्नओव्हर मिळवला.त्यांनी मुलांसाठी आर्ट अँड कल्चर किटचीदेखील सुरुवात केली होती. त्यानंतर स्टेशनरी, खेळणी, गेम्स आणि होम प्रोडक्ट्सपर्यंत उत्पादनाला सुरुवात केली.

शोभित यांच्याकडे 500हून अधिक SKU (स्टॉक-कीपिंग यूनिट्स) आहेत. त्यांनी प्ले-डॉ, माय लिटिल पोनी, प्लेस्कूल, बार्बी, हॉट व्हिल्स, मार्व्हल, फ्रिशर-प्राइस, डिज्नी सारख्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी लायसन्स मिळवलं आहे. कंपनीकडे संपूर्ण भारतात वितरण नेटवर्क आहे. 30,000 हून अधिक दुकानांपर्यंत आहे.