सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी क्रिडा क्षेत्रातही आता उडी घेतली आहे. हे सेलिब्रिटी वेगवेगळ्या खेळांच्या टीमचे मालक झाले आहेत. आयपीएलमध्ये तर किंग खान शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला, प्रिती झिंटा यांनीही टीम खरेदी केल्या आहेत. आता अभिनेता सलमान खानही यात मागे राहिला नाहीये. त्यानं देखील क्रिकेट टीम (Cricket Team) खरेदी केल्याचं समोर आलंय.
बॉलिवूडमधील ‘किंग खान’ शाहरुख खानप्रमाणंच भाईजान सलमान खान ही आता क्रिकेट टीमचा मालक झाला आहे. सलमान खान इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये (ISPL) दिल्ली टीमचा मालक झालाय.
शाहरुख खान इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे. ISPL च्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सलमाननं या लीगमध्ये एन्ट्री केली आहे. या लीगमध्ये अमिताभ बच्चन , सैफ अली खान, करीना कपूर खान, अक्षय कुमार, सूर्या, ऋतिक रोशन आणि राम चरण यांसारख्या कलाकारांचाही सहभाग आहे.
सुपरस्टार सलमान खान आयएसपीएलच्या दिल्ली फ्रँचायझीचा मालक असणार आहे.आयएसपीएलच्या दुसऱ्या सीझनमध्ये २.८ कोटींपेक्षा जास्त दर्शकांनी टीव्हीवर सामना पाहिला, ज्यामुळं पहिल्या सीझनच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढ झाली.सलमान खानच्या येण्यानं केवळ दिल्ली टीमलाच नव्हे, तर संपूर्ण लीगला एक ग्लॅमर मिळाल आहे.
