‘छावा’, ‘अॅनिमल’ आणि ‘पुष्पा 2’ यांसारख्या ब्लॉरबस्टर मूव्ही देणारी रश्मिका मंदानाचा सध्या फक्त साऊथच्याच नाहीतर बॉलिवूडच्या सुपरस्टार सेलिब्रिटींमध्येही समावेश होतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर रश्मिकानं फार कमी वेळात आपली छाप सोडलीय. नॅशनल क्रश असणारी रश्मिका अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. अशातच सलमान खानच्या ‘सिकंदर’ सिनेमानंतर मात्र रश्मिका कोणत्यात सिनेमात दिसली नाही. अशातच चाहते तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. रश्मिकानं चाहत्यांची आतुरता संपवली आहे. रश्मिकानं आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.
रश्मिका (Rashmika) लवकरच तिच्या नव्या कोऱ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. काही वेळापूर्वी, रश्मिका मंदाना हिनं तिच्या आगामी चित्रपट ‘मैसा’ मधील तिचा पहिला लूक शेअर केला आहे. रश्मिकाचा हा लूक काळजाचा ठोका चुकवणारा आहे. रश्मिकाच्या चेहऱ्यावर खूप राग दिसतोय, तर तिनं हातात शस्त्र घेतलं आहे. एवढंच नाहीतर रश्मिकाचे हात आणि चेहरा पूर्णपणे रक्तानं माखलेला आहे. रश्मिकाचा खुंखार लूक काही काळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
पोस्टर शेअर करताना अभिनेत्री रश्मिका मंदानानं एक हटके कॅप्शन लिहिलं आहे. रश्मिकानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मी नेहमीच तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते… काहीतरी वेगळं… काहीतरी रोमांचक… आणि हे… हे त्यापैकीच एक आहे.. एक अशी व्यक्तिरेखा जी मी यापूर्वी कधीही साकारली नाही… एका अशा जगात मी कधीही पाऊल ठेवलेलं नाही… आणि माझी एक बाजू जिला मी आतापर्यंत कधीही भेटले नाही.. ती भयंकर आहे.. ती तीव्र आहे आणि ती अत्यंत कच्ची आहे.. मी खूप घाबरलेली आणि खूप उत्साहित आहे, आपण काय तयार करणार आहोत, हे पाहण्यासाठी मी खरोखर वाट पाहू शकत नाही.. ही फक्त सुरुवात आहे…”
