सांगोला तालुक्यासाठी नवीन एमआयडीसी मंजूर करणार

सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड. शहाजी पाटील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन एम. आय . डी. सी. उभारावी,अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन केली. सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नवीन एम. आय. डी. सी. मंजूर करण्याचे आश्वासन माजी आ. ॲड. शहाजी पाटील याना दिले आहे.

नवीन एम . आय. डी. सी. मुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. भविष्यात उद्योग व्यवसाय वाढल्याने तालुक्यात क्रांती होईल,भविष्यात उद्योगाचे जाळे निर्माण होऊन तालुक्याची अर्थव्यवस्था बळकट होईल.

तरुणांना नोकरी मिळेल. त्यामुळे सांगोला तालुक्याचा व्यापारीदृष्ट्या विकास होईल. व `तालुक्याच्या विकासास चालना मिळेल. व्यापारी व औदिकदृष्ट्या तालुक्याचा कायापालट होणार आहे, अशी माहिती माजी आमदार शाहजी पाटील यांनी दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीप्रसंगी उद्योगपती अभिजित नलवडे ,योगेश खटकाळे,विशाल खटकाळे हे उपस्थित होते.