मुंबईच्या गोरेगाव वनराई पोलिसांनी मोठे ट्रक (Truck) चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं आहे. या चोरट्यांनी मुंबई शहरात ट्रक चोरी करुन धुमाकूळ घातला होता. मुंबई शहरातून या चोरट्याने ट्रक चोरी करून गुजरात राज्यामध्ये घेऊन गेले होते. तिथे ट्रकचा चेसी नंबर बदलून गुजरातचे पासिंग करून त्या राज्यामध्ये हे पुन्हा ट्रक चालवत होते. या प्रकरणी वनराई पोलिसांनी वेगवेगळ्या सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करत दोन चोरट्यांना अटक केली आहे.
दरम्यान, अटक केलेल्या चोरट्यांकडून वनराई पोलिसांनी चोरीचे 6 मोठे ट्रक जप्त केले आहेत. ज्याची किंमत करोडो रुपये आहे. सध्या या आरोपींनी आणखी काही ट्रक मुंबई शहरातून चोरी केली आहे का? या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहे का? या संदर्भात अधिक तपास वनराई पोलीस करत आहे.
