जिल्हा नगररचना विभागामार्फत प्रारूप विकास आराखडा जाहीर

सांगली नगररचना विभाग (Department) सहायक संचालक यांच्यामार्फत आटपाडी नगरपंचायत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्यातील कोणत्याही प्रयोजनाबद्दल कोणालाही हरकत असेल तर आटपाडी नगरपंचायत कार्यलयात प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेल्या दिवसापासून ३० दिवसाच्या आत हरकत दाखल करता येणार आहे. दरम्यान कोणाच्या हरकती असतील तर त्यांनी नागरपंचायतीकडे द्याव्यात , असे आवाहन मुख्यधिकारी वैभव हजारे यांनी केले.

नगररचना विभागाने आटपाडी शहराचा समतोल आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी नवीन झोन रचना व प्रस्तावित रस्ते आराखडा तयार केला आहे. नागरपंचायतीने सार्वजनिक नोटीसद्वारे हा प्रस्ताव प्रसिद्ध केला असून , ठराविक कालावधीत हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या झोन रचनेत रहिवासी , व्यावसायिक ,औदयोगिक ,शेती आणि सार्वजनिक उपयोगाच्या जागांची नव्याने विभागणी करण्यात आली. आहे. तसेच शहरातील प्रमुख आणि दुय्यम रस्त्यांचे प्रस्तावित रुंदीकरण , नवीन रस्ते या अंतर्गत मार्ग यांचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.

या पप्रस्तावामुळे अनेक नागरिकांचे घर , जमीन , दुकाने झोन बदलामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. नवीन झोन रचनेमुळे शहराचा विकास नियोजनबद्द होणार आहे. नगरपंचायतीमार्फत सर्वांचे हित जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी विकास आराखडा , झोन दर्शक नकाशाचे फलक नगरपंचायत मुख्याधिकारी कार्यलयासमोर लावले आहेत. विकास आराखडा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील विकास आराखडयावर सर्व स्तरातून चर्चा सुरु झाली आहे.