पांढरेवाडी – दिघंची येथील अनेक वर्षांपासूनचा प्रश्न प्रलंबितच, प्रशासनाने दखल घेण्याची नागरिकांची मागणी

सध्या प्रत्येक भागात काही ना काही समस्या, प्रश्न हे आहेतच ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते. वेळोवेळी या मागण्या पूर्ण करण्याची मागणी होत असते. पांढरेवाडी – दिघंची येथे एकही महा ई सेवा केंद्र नाही हि सेवा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी महा ई सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. गावात सेवा केंद्र नसल्याने दाखले काढण्यासाठी येथील नागरिकांना आटपाडीला हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

त्यामुळे पांढरेवाडी – दिघंची येथे महा ई सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे. आटपाडी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे पुजारवाडी हे गाव आहे तर पुजारवाडी व पांढरेवाडी अशी महसुली दोन गावे आहेत या दोन्ही गावात एकही महा ई सेवा केंद्र नाही त्यामुळे येथील नागरिकांना आटपाडीला १५ ते २० किमी जावून दाखले काढावे लागत आहेत यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे.

तसेच गेल्या अनेक वर्षापासून पांढरेवाडी – दिघंची या ठकाणी महा ई सेवा केंद्र सुरु करावे अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन महा ई सेवा केंद्र सुरु करावे, अशी मागणी होत आहे.