भारतात ग्लूटाथियोनची किंमत किती ? अँटी-एजिंग आणि इंजेक्शन शिवाय ग्लूटाथियोन कसे वाढवावे ?

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालं. तिचा अचानक मृत्यू झाल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकारांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या घरातून अनेक गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये त्वचा उजळवणारी औषधे, ग्लूटाथिओन (Glutathione) आणि व्हिटॅमिन सीची इंजेक्शन्स यांचा समावेश आहे.

दरम्यान, शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्यामध्ये अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, ग्लूटाथिओन म्हणजे नक्की काय? ते वृद्धत्वविरोधी औषधांमध्ये कसे कार्य करते. त्यासोबतच भारतात त्या इंजेक्शनची किंमत किती आहे.

ग्लूटाथिओन हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे तीन अमिनो ॲसिड्सपासून बनलेले असते. जे शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. शरीराच्या पेशीचं संरक्षण करते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. त्वचा उजळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यामुळे यकृत आणि मूत्रपिंड यांचं आरोग्य सुधारते.

ग्लूटाथिओन हे त्वचा उजळवण्यासाठी प्रसिद्ध मानले जाते. ग्लूटाथिओन गोळ्या, क्रीम आणि इंजेक्शनच्या स्वरुपात बाजारात उपलब्ध आहे. ग्लूटाथिओन घेतल्यास त्वचा गोरी आणि चमकदार होते. बॉलिवूडसह इतर लोक देखील अधिक सुंदर दिसण्यासाठी ग्लूटाथिओनचे इंजेक्शन आणि गोळ्या घेऊ लागले आहेत.

टाथिओनची किंमत किती?

ग्लूटाथिओनच्या किंमती या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी असू शकते. जसे की पुढील प्रमाणे.

दिल्ली- गुरुग्राममध्ये ग्लूटाथिओनचे इंजेक्शन 4 ते 12 हजार रुपयांना मिळते.

मुंबईत- ग्लूटाथिओनचे इंजेक्शन 8 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 10 इंजेक्शनच्या पॅकेटची किंमत 60 हजार रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

ग्लूटाथिओनच्या गोळ्या घ्याच्या म्हटलं तर 30 गोळ्यांची किंमत 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

नैसर्गिकरित्या ग्लूटाथिओन कसे वाढवावे?

नैसर्गिकरित्या ग्लूटाथिओन वाढवण्यासाठी आहारात काही खास गोष्टींचा समावेश करावा लागले. ज्यामध्ये हिरव्या भाज्या, ब्रोकोली, कोबी, पालक आणि टोमॅटो. तसेच लसूण आणि कांदे खावे. यामध्ये सल्फर भरपूर असते. जे ग्लूटाथिओन तयार करते. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी वाढवा. यासाठी तुम्ही लिंबू, संत्री, किवी, स्ट्रॉबेरी आणि आवळा खाऊ शकता. या सोबतच पुरेशी झोप घेतल्याने शरीर स्वतःच ग्लूटाथिओन तयार करते. दररोज हलका व्यायाम करा आणि स्वतःला तणावापासून दूर ठेवा.