आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याला बनवण्यासाठी 14 वर्षे लागली होती. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो चित्रपट (Film) 65 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. ज्याला बनवण्यासाठी निर्मात्यांना तब्बल 14 वर्षे लागली होती. या चित्रपटावर निर्मात्यांनी प्रचंड पैसा खर्च केला होता. हा चित्रपट पूर्ण होऊन जेव्हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तेव्हा थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी वेडे झाले होते. थिएटरबाहेर तिकीटासाठी 5-6 किलोमीटर पर्यंत रांगा लागाच्या.
65 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या फक्त एका गाण्यावर त्यावेळी 10 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. आज एका गाण्यासाठी तब्बल 50-100 कोटी रुपये लागतात. आम्ही ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट 1960 साली प्रदर्शित झाला होता. हा हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. 60 च्या दशकातील सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांपैकी हा एक आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरच्या बाहेर 5-6 किमी लांबपर्यंत रांग लावत होते. तरी देखील या चित्रपटाचे तिकीट लवकर मिळत नव्हते. यामुळे काही प्रेक्षक तिकीट खरेदी करण्यासाठी रात्रभर रस्त्यावर झोपायचे आणि सकाळी थिएटर उघडल्यानंतर तिकीट खरेदी करून चित्रपट बघायचे. या चित्रपटाची तिकीटाची विक्री अनेक दिवस अशीच सुरु होती. के. आसिफ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार व मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मुघल इतिहासातील कथाविषयावर हा चित्रपट आधारलेला आहे. या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी 14 वर्षे लागली. या चित्रपटाचे बजेट 1.5 कोटी रुपये इतके होते. या चित्रपटाने त्यावेळी 11 कोटींची कमाई केली होती. आजचा विचार केला तर ही कमाई 3650 कोटी रुपये इतकी आहे. सर्वात जास्त कमाई करून या चित्रपटाने 60 च्या दशकात एक नवीन विक्रम केला होता. हा विक्रम ‘शोले’ या हिंदी चित्रपटाने मोडेपर्यंत अबाधित राहिला. ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय झाली होती.
