विटा येथे डॉ. आंबेडकर, क्रांतिसिंहांना अभिवादन 

क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विनायकराव जाधव, तर अध्यक्षस्थानी प्रा. विलास पाटील होते. कार्यक्रमास, संस्थेचे अध्यक्ष सुभाष पवार, अॅड. सुभाष पाटील, सचिव नानासाहेब पाटील, स्वाती पाटील, इंद्रजित पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन लता सुतार यांनी केले, प्रास्ताविक विजयकुमार महिंद यांनी केले, तर आभार तांबोळी यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, उपस्थित होते.