सोलापुरात कोरोनाचे सहा रुग्ण! नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सोलापूर शहरात गेल्या आठवड्याभरात सहा कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यापैकी दोन रुग्ण आता बरे झाले आहेत उर्वरित चार रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली. नागरिकांनी सतर्क रहावे असे आव्हान देखील यांनी यावेळी केले. राज्यात कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे.

गेल्या सात दिवसात केलेल्या चाचण्यामधून सहा रुग्ण आढळून आले यातील दोन रुग्णांना सौम्य लक्षणे होती. हे रुग्णू औषधोपचाराणे बरे झाले. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. शहरात गड्डा यात्रेची तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी अनावश्यक गर्दीत जाणे टाळावे. सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी मास्क वापरावा असे आवाहन देखील करण्यात आले.