अखेरच्या टप्प्यात आलेल्या राम मंदिराच्या बांधकामाचा आढावा संपूर्ण देशानं घेतला आणि आता या मंदिरासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी माहिती तितक्याच आत्मियतेनं जाणून घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. नव्या वर्षात म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला अखेर राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवसासाठी सध्या अयोध्यानगरी सज्ज होताना दिसत असून दर दिवशी शहर कात टाकत असल्याचाच भास होत आहे. प्राणप्रतिष्ठेचा दिवस अनेकांसाठीच बहुमुल्य असला तरीही 30 डिसेंबर 2023 हा दिवससुद्धा अयोध्यावासियांसाठी अतीव खास आणि अविस्मरणीय असणार आहे.
अयोध्येला संपूर्ण जगाशी जोडू पाहणारे अनेक प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी अयोध्येत उपस्थित राहणार असून, भव्य स्वरुपातील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यामध्ये अनेक प्रकल्पांच्य़ा लोकार्पणासह अयोथ्येतील विमानतळाच्या उदघाटन सोहळा (Ayodhya Airport), रेल्वे स्थानकाचं (Ayodhya Dham Railway Station) उदघाटन आणि दोन अमृत भारत रेल्वेंना (Amrit Bharat Train) हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.