‘काकडीचे पाणी’ शरीरासाठी ठरेल वरदान

काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते. त्यामुळे काकडीचं पाणी (Cucumber wate) दिवसभर शरीरात हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करते. हे प्यायल्याने थकवा कमी होतो आणि उष्णतेचा त्रासही टाळता येतो. काकडीमध्ये कॅलरींचं प्रमाण कमी असल्यामुळे ती वजन घटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. काकडीचं पाणी पिऊन पोट भरल्यास अधिक खाणं टाळता येतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात. काकडीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ती पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठीही हे पाणी उपयुक्त ठरू शकते काकडीमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स असतात. हे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. दररोज काकडीचं पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत सुधारतो. काकडीमध्ये आढळणारे पोटॅशियम हे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. विशेषतः हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.