त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले काही पदार्थ कोलेजन वाढवण्यास आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. म्हणून, तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे हे आज या लेखातून जाणून घेऊयात
ब्रोकोली त्वचेसाठी फायदेशीर आहे
ब्रोकोली त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हेल्थलाइनच्या मते, ब्रोकोलीमध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच त्यात झिंक, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील असते जे त्वचेतील कोलेजन वाढवते आणि त्वचा निरोगी बनवते. यासोबतच ब्रोकोलीमध्ये ल्युटीन देखील असते जे कॅरोटीनॉइड आहे आणि ते बीटा कॅरोटीनसारखे काम करते. ल्युटीन त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवते.
टोमॅटो त्वचा मऊ बनवतो
टोमॅटो हे प्रत्येक पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात वापर केला जातो. कारण यात व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. बीटा कॅरोटीन, लायकोपीन, ल्युटीन असते जे त्वचेला सूर्याच्या किरणांपासुन संरक्षण करते आणि त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर करते.
डार्क चॉकलेटचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत
डार्क चॉकलेट त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यास मदत करते. हेल्थलाइनच्या मते, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की 6 ते 12 आठवडे डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वचा हायड्रेट राहते. त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि सनबर्नची समस्या कमी होते.
पपई फायदेशीर आहे
पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात. 2014 च्या एका अभ्यासात असे आढळून आले की पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असते जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
रताळं त्वचेला चमक देते
त्वचा चमकदार (Glowing Skin) करण्यासाठी रताळे खावेत. हेल्थलाइनच्या मते, त्यात बीटा कॅरोटीन नावाचे पोषक तत्व असते जे प्रो व्हिटॅमिन ए सारखे काम करते आणि शरीरात त्याचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करते. त्यात बीटा कॅरोटीनसारखे कॅरोटीनॉइड असतात जे त्वचेला निरोगी बनवतात तसेच उन्हापासून वाचवतात.
