सांगलीचा पुढचा खासदार मी किंवा चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यापैकीच असेल, असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली.
कडेगाव तालुक्यातील येतगाव येथे कुस्ती मैदानात ते बोलत होते. आमदार विश्वजित कदम यांच्यासह डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही तुफान फटकेबाजी केली. डॉ. कदम यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्ते अर्जुन कणसे यांनी मैदान आयोजित केले होते.
विशाल पाटील यांनी कडी करत अप्रत्यक्षपणे खासदार संजय पाटील यांना टोला लगावला. पुढचा खासदार या व्यासपीठावरचा होईल,असे सांगत सांगली लोकसभेला विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशा लढतीचे संकेत दिले.