टेम्भूर्णी , माढा तालुक्यातील अरण येथील दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे (वय १०) याचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय ३८) याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. भावकीच्या वादातून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
शनिवारी सकाळी जाधववाडी (ता. माढा ) शिवारात बेपत्ता कार्तिक खंडाळे याचा कॅनॉलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. त्याचा निर्घृण खून झाल्याचे समोर आले. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह जाधववाडी शिवारात कॅनॉलमध्ये मिळून आला. तेथे दुर्गंधी पसरली होती. मृतदेहाशेजारी दोन चाकू , मोजे व रक्त लागलेला दगड मिळून आला होता.
