चौथ्या कसोटीपूर्वी भारताचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे आता भारताच्या संघात चार खेळाडूंची जागा रीक्त असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पाचव्या कसोटी सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indian) खेळाडूची भारताच्या संघात एंट्री होणार असल्याचे आता समोर आले आहे.
इंग्लंडमध्ये चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांना धावा करण्यात अडचण येत होती. एकाही खेळाडूना पहिल्या डावात शतक करता आले नाही. भारतीय खेळाडू धावा करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारताची फलंदाजी भक्कम करण्यासाठी आता संघात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची एंट्री होऊ शकते, असे आता समोर येत आहे. कारण इंग्लंडमध्ये त्याने आता दोन शतक पूर्ण केली आहेत, त्याचबरोबर दोन शतकं त्याच्या नावावर आहेत.
मुंबई इंडियन्सकडून दमदार कामगिरी केल्यावर हा खेळाडू थेट इंग्लंडमध्ये दाखल झाला. इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी त्याने हॅम्पशायरचा संघ निवडला. या संघाकडून खेळत असताना त्याने इसेक्सविरुद्धच्या सामन्यात १०० धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर वोरसेस्टशायरच्या सामन्यातील दोन्ही डावांत त्याने अनुक्रमे ५६ आणि ४७ धावा केल्या. त्यानंतर नॉटिंगहमशायरच्या सामन्यात त्याने ११२ धावांची दमदार खेळी साकारली होती. आतापर्यंत तीन सामन्यांत खेळताना या खेळाडूने दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावले आहे. या संघासाठी सर्वात फॉर्मात असलेला खेळाडू आहे तो म्हणजे तिलक वर्मा. कारण सध्याच्या घडीला तिलक वर्मा तर इंग्लंडमध्येच आहे आणि तो चांगल्या फॉर्मातही आहे. दुसरीकडे भारताच्या संघाला दमदार खेळी साकारणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या संघात तिलक वर्माची एंट्री होऊ शकते, असे आता समोर येत आहे.
