सुरूलच्या माता- भगिनींनी घेतला सहलीचा आनंद…

रेठरे धरण येथील २०० महिलांसाठी गणपतीपुळे येथे मोफत सहल काढली, सुरूल येथील युवकांनी राबविलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थ व महिलांनी स्वागत केले.गावातील सामान्य कुटुंबातील महिलांना वेळेअभावी व पैशाअभावी बाहेर फिरायला जाणे घडत नाही. आपल्या घरातील सर्व कामांचा डोलारा महिला सांभाळतात, त्यांनादेखील थोडासा विरंगुळा मिळावा या हेतूने- सरूल गावातील तरुणांनी एक अनोखा उपक्रम राबवून मोफत पर्यटन घडवून आणले.

यावेळी महिलांनी गणपतीपुळे समुद्रकिनारी मनसोक्त आनंद लुटला. यावेळी गावातील महिलांना देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद मिळाला. महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. देवदर्शन तसेच समुद्र किनाऱ्याचा आनंद मिळाल्याने महिला खुश होत्या. या अशा उपक्रमाचे सुरूल ग्रामस्थांनी कौतुक केले. या उपक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील, सम्राट पाटील, प्रकाश पाटील, खंडू पाटील, दादासो पाटील, सदाशिव पाटील, सुखदेव पाटील, युवाशक्तीच्या सर्व टीम यांनी परिश्रम घेतले.