भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा आणि पाचवा टेस्ट सामना सुरु आहे. या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियावर (Team India) एक वेगळंच संकट ओढावलं आहे. या दौऱ्यावर ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, ज्याच्याकडून इंग्लंडच्या जमिनीवर 18 वर्षांनी मालिका जिंकवण्याची आशा होती, त्याच फलंदाजाने भारतीय संघाच्या संधीवर पाणी फेरलं आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या नाराजीचा तो केंद्रबिंदू बनला आहे. या स्टार क्रिकेटपटूने भारतीय चाहत्यांसाठी गुन्हेगार बनला आहे.
यशस्वी जायसवाल हा नावाजलेला डावखुरा सलामीवीर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पण यावेळी चांगल्या अर्थाने ही चर्चा होत नाहीये. लीड्स कसोटीत झळकवलेलं शतक हा अपवाद ठरला, कारण त्यानंतरच्या डावांमध्ये त्याची कामगिरी सातत्याने ढासळलेली दिसली. मागील 8 डावांमध्ये त्याने केवळ 192 धावा जमवल्या असून त्यातील अनेक इनिंग्समध्ये तो एकेरी किंवा कमी धावसंख्येवर माघारी परतला आहे.
जायसवालचा फॉर्म घसरल्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळत नाहीये. ओपनिंगमध्ये अपयश आल्याने मधल्या फळीतल्या फलंदाजांवर दबाव वाढतोय. लॉर्ड्स, मँचेस्टर आणि आता ओव्हल या महत्त्वाच्या कसोटीत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ओव्हल कसोटीत पहिल्याच दिवशी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो अवघ्या 2 धावांवर माघारी परतला.
यशस्वीच्या या अचानक फॉर्म घसरणीमुळे तो आता अनेक चाहत्यांसाठी भारतीय संघासाठी ‘गुन्हेगार ’ ठरत आहे. त्याच्या एकूण टेस्ट कारकीर्दीकडे पाहिलं तर त्याने 24 कसोटीत 2091 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतकं, 2 डबल शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र सध्या सुरू असलेली मालिका त्याच्यासाठी धक्का ठरत आहे. टी-20 मध्ये त्याने 23 सामने खेळताना 723 धावा ठोकल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 164.31 इतका आहे. 82 चौकार आणि 38 षटकार त्याने खेचले आहेत. एक शतक आणि पाच अर्धशतकं त्याने टी-20 मध्ये नोंदवली आहेत. वनडे कारकीर्द मात्र अद्याप फिकट असून त्याने फक्त एकच सामना खेळला आहे, ज्यात त्याने 15 धावा केल्या.
