मी माझे टॅलेन्ट विकायला आलेय, स्वत:ला नाही’, ‘रामायण’मधील अभिनेत्रीचे कास्टिंग काऊचवद्दल वक्तव्य

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचवर अनेक कलाकारांनी आतापर्यंत आपले अनुभव शेअर केले आहेत. दरम्यान, आता टीव्ही आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनीदेखील कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूड बबल या माध्यमाशी बोलताना त्यांनी कास्टिंग काउचचा सामना त्यांना देखील करावा लागल्याचा खुलासा केला आहे. फक्त एकदा नाही तर अनेक वेळा. पुढे त्या म्हणाल्या की, मी असं नाही म्हणणार की हे फक्त हिंदी किंवा मुंबईतच घडलं. पण साउथ इंडस्ट्रीत याचा अनुभव अधिक आला. एका मोठ्या प्रोजेक्टसाठी माझं नाव फायनल झालं होतं. सर्व काही सुरळीत सुरु होतं, पण एक लहानशा स्टेटमेंटमुळे सर्व नातं बिघडलं. मी डोळे बंद करून मनात म्हणाले, छी…ही फिल्म हातातून निघून गेली. त्यानंतर घरी आल्यावर मी निर्मात्याला मेसेज केला. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, ‘सर, मी माझं टॅलेंट विकायला आले आहे, स्वत:ला नाही’. त्यावेळी माझे शब्द कठोर होते कारण मला वाटतं की स्पष्ट बोलणं महत्त्वाचे आहे. कारण यामुळे तुम्ही स्थिर राहू शकता. तुमची ऊर्जा टिकून राहते आणि पुढे जाणं शक्य होतं. मात्र, इंडस्ट्रीमधील अशा काही घटनांमुळे काही चांगले प्रोजेक्ट्स मी गमावले आहेत. त्यामुळे मी टीव्हीकडे वळले असं त्यांनी सांगितलं. इंदिरा कृष्णन लवकरच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ (Ramayana) या चित्रपटात माता कौशल्याच्या भूमिकेत झळकणार आहेत.