समाज हितासाठी महापुरुषांचे विचार प्रेरक

 समाजहितासाठी महापुरुषांचे विचार प्रेरक आहेत. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार पुस्तके, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून करून युवकांच्या हृदयात हे विचार रुजवणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जायंटस ग्रुप आष्टाचे दीपक मेथे-पाटील यांनी केले.

आष्टा जायंट्स ग्रुपच्या वतीने लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील माने समीर गायकवाड प्रमुख उपस्थित होते. दिपक मेथे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, शहीद चंद्रशेखर आझाद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर आदी महापुरुषांचे विचार व शिकवण केवळ अभ्यासक्रमात अथवा व्यासपीठावर सांगून चालणार नाही तर त्यांच्या विचारधारेची पिढी घडण्यासाठी समाजातच त्यांचे विचार रुजणे गरजेचे आहे. कृषिभूषण सुनील माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रुपचे उपाध्यक्ष किरण काळोखे, मुकुंद इंगळे, खजिनदार इंजिनियर दत्ता मस्के, दत्तराज ओतारी, बाबासो सिद्ध, अभिजीत वग्यांनी, धवल मालगावे प्रभाकर जाधव व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.