आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे सुख समृद्धीचे जावो ही सदिच्छा. तुमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वर्षाचं स्वागत करताना द्विगुणित करण्यासाठी जवळच्या व्यक्तींच्या शुभेच्छा नेहमीच उत्साह वाढवतात. या शुभेच्छा सिटी वार्ता परिवाराकडून तुमच्यासाठीच खास.
प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं…
पण या नव्या वर्षात तुम्हाला
सर्व काही मिळो जे
तुम्हाला मनापासून हवं आहे.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
गेलं ते वर्ष, गेला तो काल
नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले 2024 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!