जरांगे पाटलांच्या चित्रपटाचा टीझर रिलिझ…..

मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच रिलिझ झाला असून प्रेक्षकांकडून त्याला पसंती मिळत असल्याचं दिसतंय.टिझरमध्ये मनोज जरांगे पाटील एकदम डॅशिंग अंदाजामध्ये दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचे चित्रण यामध्ये दिसत आहे. “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपट २६ एप्रिलला चित्रपटगृहात पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राने जरांगेंचे आंदोलन पाहिले आहे. आता हाच संघर्ष प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

चित्रपटाच्या टिझरमध्ये, ‘मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारा अभिनेता म्हणताना दिसतोय की, मी बायकोला जातानाच सांगून आलोय. की आलो तर तुझा आणि नाही आलो तर समाजाचा. कुंकू पुसून तयार राहा.’ चित्रपटाचा टिझर जबरदस्त वाटत असून चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा आहे. काही दिवसात चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलिझ होण्याची शक्यता आहे.