भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या काही वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरु आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारात असेही स्टॉक्स ज्यांनी बाजारातील चढ-उतारांना न जुमानता गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक नेहमीच हजारो-लाखोंच्या गुंतवणुकीवर कोट्यवधींचा परतावा देऊ शकतील अशा स्टॉक्सच्या शोधात असतात.
शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांनी आजवर गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. असाच एक स्टॉक गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. यापैकी एक शेअर गॅब्रिएल इंडिया लिमिटेड आहे, ज्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक सातत्याने अप्पर सर्किट हिट करत आहे. कधीकाळी अवघ्या 10 रुपयांना मिळणाऱ्या या स्टॉकने आता 1075.80 वर मुसंडी मारली आहे.
या स्टॉकने चार महिन्यांपेक्षा कमी काळात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला असून सहा महिन्यातही गुंतवणूक दुप्पट परतावा दिला आहे. याशिवाय गेल्या एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकचा परतावा स्थिर राहिला आहे पण, दीर्घकाळात गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला किंवा या स्टॉकने पैशाचा पाऊस पडला आहे, असं वावगं ठरणार नाही.
एका वर्षात या स्टॉकने सुमारे 120 टक्के परतावा दिला आहे पण, या स्टॉकने फक्त चार महिन्यात दुप्पट परतावा दिला आहे. मात्र एका वर्षात गुंतवणुकीवर परतावा स्थिर राहिला आहे. म्हणजे यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये गुंतवलेले एक लाख रुपये आता दुप्पट झाले असतील.
दीर्घकाळात या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. एप्रिल 2005 मध्ये या स्टॉकची किंमत 9 रुपये होती तर आता हा शेअर 1075.80 रुपयांवर व्यवहार करत आहे. म्हणजेच, या शेअरने 20 वर्षांत 11000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या काळात म्हणजे 20 वर्षांपूर्वी, एप्रिल 2005 मध्ये, एक लाख रुपये गुंतवले असतील तर तुमची गुंतवणूक 1.11 कोटी रुपये झाली असेल. म्हणजे फक्त 1 लाख रुपये गुंतवून तुम्ही करोडपती झाला असता.
