लवंगांमधे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. लवंग पाण्यात उकळून पिण्यामुळे त्यातले सर्व गुणधर्म शरीरापर्यंत सहज पोहोचतात. रक्तातील साखरेवर नियंत्रण, वजन कमी करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही लवंगांचं पाणी (Clove water) उपयुक्त आहे.
अन्नाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्य आणि सौंदर्यासाठीही लवंग खूप फायदेशीर आहे. दररोज सकाळी लवंग पाणी प्यायला सुरुवात केली तर शरीरातील अनेक लपलेले आजार बरे होऊ शकतात.
खरंतर, लवंगांमधे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. लवंग पाण्यात उकळून पिण्यामुळे त्यातले सर्व गुणधर्म शरीरापर्यंत सहज पोहोचतात. रक्तातील साखरेवर नियंत्रण, वजन कमी करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही लवंगांचं पाणी उपयुक्त आहे.
लवंग पाणी पिण्याचे फायदे
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी उपयुक्त
लवंग घातलेलं पाणी प्यायल्यानं गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत होते. त्यातले अँटी-बॅक्टेरियल आणि कार्मिनेटिव्ह गुणधर्म पचनक्रिया सुधारतात.
वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट लवंग पाणी प्यायला सुरुवात करा. हे खूप प्रभावी आहे. यामुळे चयापचयाचा वेग वाढेल आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगानं होईल.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
लवंगांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. दररोज लवंगाचे पाणी प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी आणि खोकल्यासारखे आजार शरीरापासून दूर राहतात.
साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त
लवंगांचं पाणी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित करण्यास मदत होते. साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे नियंत्रित होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग पाणी फायदेशीर ठरू शकतं. पण मधुमेह असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे पाणी प्यावं.
